कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
schedule06 Aug 26 person by visibility 148 categoryशैक्षणिक
वारणानगर : वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वारणा विद्यापीठ परिसरात कार्यरत असणाऱ्या तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, वारणानगर येथे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने थ्री डी प्रिंटिंग कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना अत्याधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाची ओळख करून देणे तसेच त्याचा आर्किटेक्चर क्षेत्रातील प्रभावी वापर समजावून सांगणे हा होता. कार्यशाळेत थ्री डी मॉडेलिंग, स्लायसिंग सॉफ्टवेअरचा वापर, थ्री डी प्रिंटरची रचना व कार्यपद्धती, विविध प्रिंटिंग तंत्रे तसेच प्रत्यक्ष थ्री डी प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः विविध डिझाइन्स तयार करून त्यांचे यशस्वी प्रिंटिंगही केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक डिझाइन, डिजिटल फॅब्रिकेशन आणि आर्किटेक्चरल मॉडेल तयार करण्यासाठी 3D प्रिंटिंगचा प्रभावी वापर कसा करता येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशील विचारांना नवी दिशा मिळाली. कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त व भविष्यातील करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य राजेंद्र ऐनापुरे आणि यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वयक बी. आर . बागणे यांनी केले .