SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणबिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्नमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेटएमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहनशासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पणछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदीडॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभाजागतिक हिरोशिमा दिन: मानवी इतिहासातील काळा दिवस आणि शांततेचा संदेशवक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जाहिरात

 

बिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

schedule06 Aug 26 person by visibility 249 categoryराज्य

कोल्हापूर : बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना बुधवारी ​बिहारच्या राज्यपाल भवनात श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय ​बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (रि.) सय्यद अता हसनैन यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सतेज पाटील यांना पत्र पाठवून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

​शोक संदेशात म्हंटले आहे की, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. त्यांचे निधन म्हणजे सार्वजनिक जीवन, शिक्षण क्षेत्र आणि राष्ट्र उभारणीला समर्पित असलेल्या एका प्रेरणादायी युगाचा अंत आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांना एक दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ, प्रतिष्ठित नेते आणि संवेदनशील प्रशासक म्हणून नेहमी आदराने आठवले जाईल. 

बिहारचे राज्यपाल म्हणून आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्याला दूरदर्शी नेतृत्व दिले आणि उच्च शिक्षण, सुशासन तसेच प्रशासकीय संस्थांच्या सक्षमीकरणात मोठे योगदान दिले.  

दरम्यान,​बिहार लोक भवन, पटना येथे शोक सभा  झाली. राज्यपाल लेफ्टनंट जनरल (रि.) सय्यद अता हसनैन यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभा आयोजित करण्यात आली होती.  

​डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची भरून न निघणारी हानी झाली आहे,  या शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes