SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणबिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्नमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेटएमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहनशासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पणछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदीडॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभाजागतिक हिरोशिमा दिन: मानवी इतिहासातील काळा दिवस आणि शांततेचा संदेशवक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जाहिरात

 

शासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पण

schedule06 Aug 26 person by visibility 175 categoryराज्य

◼️सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन

मुंबई : वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, नूतनीकरण करण्यात आलेल्या मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे तसेच अत्याधुनिक सीबीसीटी (CBCT) यंत्रणेचे संयुक्त लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन व लोकार्पणही करण्यात आले.

राज्य शासनाच्या सुमारे ₹१० कोटी निधीतून श्रेणीवर्धित करण्यात आलेले शासकीय दंत महाविद्यालयाचे ४८० आसनक्षमतेचे अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह आधुनिक ध्वनीव्यवस्था, अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली, उच्च दर्जाची प्रोजेक्शन व्यवस्था, व्यावसायिक प्रकाशयोजना, वातानुकूलन, स्वतंत्र ग्रीन रूम तसेच आधुनिक स्वच्छतागृहांनी सुसज्ज आहे. हे सभागृह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

याच कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे ₹२.६० कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच; सुमारे ₹८४ लाख किंमतीच्या अत्याधुनिक सीबीसीटी (Cone Beam Computed Tomography) यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे रुग्णांचे अधिक अचूक निदान, उपचार नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक निदान तंत्रज्ञानाचे दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे.

यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक १० चे उद्घाटन, अत्याधुनिक हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (HBOT) केंद्राचे उद्घाटन, २४ तास डायलिसिस सेवेचा शुभारंभ तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CSR उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक अँम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमास शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पडावे, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर, वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी राज्य शासन आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधा रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण आणि संशोधनासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes