छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदी
schedule06 Aug 26 person by visibility 149 categoryराज्य
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांचा लोकापर्ण सोहळा 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यासंबंधी आपत्कालीन व्यवस्थापन सुरक्षा रुग्णालय परिसरातील वाहतूक नियंत्रण करणे आवश्यक आहे.
त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रम समाप्त होईपर्यंत रुग्णालय परिसरामध्ये शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी खासगी वाहनांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे.
तथापि, रुग्णसेवा अबाधित राहण्यासाठी रुग्णवाहिका (Ambulance), अग्निशामक दलाची वाहने, पोलीस, सुरक्षा व आपत्कालीन सेवांची वाहने, कार्यक्रमासाठी अधिकृत परवानाधारक (Pass Holder) शासकीय वाहने, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वाहने इत्यादी आवश्यकतेनुसार वाहनांना प्रवेश करण्याचा मार्ग हा कुंभी प्रवेशद्वारातून आत - जुन्या शवविच्छेदन कक्षाकडे - कोयना इमारतीसमोरुन आत उजव्या बाजूला - तुळशी इमारतीतून - भोगावती इमारतीजवळ वाहने जातील व तसेच याच मार्गाने संबंधित वाहनांचे निर्गमन करण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली आहे.