SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणबिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्नमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेटएमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहनशासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पणछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदीडॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभा

जाहिरात

 

कोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकन

schedule06 Aug 26 person by visibility 173 categoryशैक्षणिक

वारणानगर : वारणा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगरच्या बी. फार्म अभ्यासक्रमास क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या रँकिंग अँड रेटिंग ऑफ कॉलेजेस या प्रक्रियेत 'अ' मानांकन पाच वर्षांसाठी प्राप्त झाले आहे. सदर महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीबरोबरच एम. फार्मसी, फार्म. डी., व डी. फार्मसी हेही अभ्यासक्रम उत्कृष्टपणे राबवले जातात. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन, आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख उपक्रम आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता संवर्धन या निकषांवर महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत हे मानांकन मिळविले आहे.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांनी गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्या, डॉ. कल्पना एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत डॉ. अमोल शेरीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच क्यू.सी.आय. समन्वयक डॉ. पोपट एस. कुंभार, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रविण पाटील, डॉ. विनय बागल,  पंडित नलवडे,  सचिन कट्टीमन्नी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes