SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वीडॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्नगोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशाराठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!

जाहिरात

 

गोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशारा

schedule17 Jun 26 person by visibility 183 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांमार्फत अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. या नोटीसमध्ये शिधापत्रिकेबाबत जाचक अटी लादल्या असून, लाभार्थी कंपनीचे संचालक नसावेत, आय.टी. रिटर्न भरणाऱ्यांना योजनेतून वगळणे अशा नियमांवर शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, आय.टी. रिटर्न भरणाऱ्यांना रेशन नाकारणे हा नियम अन्यायकारक आहे, कारण रोजगारासाठी हे लोक कर्ज घेतात. तसेच, अल्प भूधारकांना नोटीस देणे चुकीचे आहे. उपनेते पोपट दांगट यांनी, "मिशन सुधार राईटफुल टारगेट" अंतर्गत गरिबांचे रेशन बंद करण्याचा भाजप सरकारचा डाव शिवसेना हाणून पाडेल, असा इशारा दिला. जर नोटीसा मागे घेतल्या नाहीत, तर गावागावांत रेशन दुकानदारांच्या दारात या नोटीसची होळी करण्यात येईल.

यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी या मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहोचवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 

या आंदोलनात राजू यादव, पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे, दिनेश परमार, संतोष चौगुले, कैलास जाधव, दिपक पोपटाणी, सुनील पारपाणी, दिपक अंकल, किशोर कामरा, मोहन रजपूत व बाबुराव पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes