SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वीडॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्नगोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशाराठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!

जाहिरात

 

बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळी

schedule17 Jun 26 person by visibility 164 categoryउद्योग

कोल्हापूर: आजच्या स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात कर्ज वसुली हे एक मोठे आव्हान आहे. अनेकदा विपरीत परिस्थितीला सामोरे जाऊन अधिकारी काम करत असतात. त्यांचे हे कार्य अत्यंत मोलाचे असून, त्यांना वीरशैव बँकेसह सर्व बँकांचे पूर्ण पाठबळ राहील, असे प्रतिपादन वीरशैव सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक वसुली अधिकारी संघ आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी इन्फोटेक मुंबईचे वाल्मीक दराडे यांनी 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा, तर पुणे येथील राजेश यादव यांनी कायद्याचा आधार घेत शिस्तबद्ध वसुलीद्वारे एनपीए (NPA) कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटक किरण कर्नाड, अध्यक्ष प्रकाश निकम आणि महासचिव एन. एस. औंधकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी राजाराम शिपुगडे, परजिता देसाई, सुभाष ओंकार आणि सतीश घाडगे यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी व वसुली अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा वसुली अधिकाऱ्यांच्या मनोबलात भर टाकणारी ठरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes