कोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'
schedule17 Jun 26 person by visibility 166 categoryसामाजिक
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा वारसा पुढे नेण्यासाठी 'राजर्षी शाहू सलोखा मंच, कोल्हापूर'च्या वतीने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद' आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत विविध राज्यांतील विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील छत्रपती शाहूजी संस्थानचे अध्यक्ष ॲड. नंद किशोर वर्मा, कुर्मी समाज प्रदेश उपाध्यक्ष कैलास पटेल, डॉ. डी. के. वर्मा, जे. एन. कटियार, इंजि. राजेश कुमार तसेच महाराष्ट्रातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. माधुरी चौगुले आणि शिवाजी विद्यापीठाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. पद्मा पाटील उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांच्या विचारांचा प्रसार देशपातळीवर करणे हे आहे. 'राजर्षी शाहू सलोखा मंच'चे निमंत्रक वसंतराव मुळीक, सह-निमंत्रक बबन रानगे आणि सचिव संजय कांबळे यांनी सर्व शाहू प्रेमींना या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेस डी.जी. भ्रास्कर, सोमनाथ घोडेराव, शशिकांत पाटील, सुखदेव बुध्ध्याळकर, कादर मलबारी, संभाजी पाटील, बाळासाहेब भोसले, शिवमूर्ती झगडे, आकाश शेलार, महेश मछले, आनंद म्हाळुंगकर, अनिल गिरी आदी उपस्थित होते.