SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वीडॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्नगोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशाराठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!

जाहिरात

 

डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटील

schedule17 Jun 26 person by visibility 162 categoryसामाजिक

▪️‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ या पुस्तकाच प्रकाशन
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके  यांचे  ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ हे संशोधनपर पुस्तक अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच संशोधकांसाठी  दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. 

डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आपल्या संशोधन आणि अभ्यासूवृत्तीतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते व  विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी  कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा,  कार्यकारी संचालक  डॉ. ए के गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. महादेव नरके यांचे वडील मारुती नरके, आई शांताबाई नरके, पत्नी मधुरा नरके, मुलगी आदिती नरके, पुतणे अमृत नरके आदी मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. संजय डी. पाटील म्हणाले,  डॉ. महादेव नरके यांनी अतिशय खडतर प्रवासातून शिक्षण घेत आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.  आज त्यांचे हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे.  हे पुस्तक विद्यार्थ्यांसह, अभ्यासकानाही मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे. 

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, डॉ. नरके यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून महत्वपूर्ण विषयावर लिखाण केले आहे.  यातील संशोधन आणि केस स्टडी या औद्योगिक अभ्यासासाठी सहाय्यभूत ठरतील, असे सांगून त्यांनी डॉ. नरके यांना शुभेच्छा दिल्या. 

लेखक डॉ.  महादेव नरके म्हणाले, पीएचडीसाठी संशोधन   करत असताना  या विषयातील संदर्भ ग्रंथांची आवश्यकता पाहून या पुस्तकाची निर्मिती झाली.कोणत्याची उत्पादनाच्या निर्मितीमध्ये कॉस्ट कटिंग, टाईम मॅनेजमेंट, रॉ टू फिनिश मॅपिंग अशा सर्व टप्प्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. आई-वडिलांनी शिक्षणाला महत्त्व दिले म्हणून आपण घडलो. या सर्व प्रवासात  डॉ. डी वाय पाटील साहेब, डॉ. संजय डी. पाटील. आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचासह पाटील कुटुंबाचे मोठे योगदान व पाठबळ लाभले. 

यावेळी डी. वाय पाटील पॉलिटेक्निकचे उपप्रचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी के शिंदे, शितल साळोखे, अक्षय करपे, अजय बंगडे यांच्यासह प्राध्यापक व  कर्मचारी उपस्थित होते. प्रा, राज आलासकर यानी सूत्रसंचालन केले तर आदिती महादेव नरके हिने आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes