SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वीडॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर पट्टणकडोली येथे "भंडारा" चित्रपटाचा भव्य टायटल लॉन्च सोहळा उत्साहात संपन्नगोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशाराठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? लोकसभेत ‘ऑपरेशन टायगर’ची खळबळ; फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेना (UBT)!

जाहिरात

 

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वी

schedule17 Jun 26 person by visibility 187 categoryआरोग्य

कणेरी : सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरीमठ येथे १३-१४ जून  रोजी ‘NSI (Neurological Society of India) मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस वर्कशॉप २०२६’ अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजवके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यशाळेत देशातील विविध राज्यांतून आलेल्या २० न्यूरोसर्जन्ससह आफ्रिका खंडातील तज्ज्ञांचा सहभाग होता.

कार्यशाळेचे उद्घाटन परमपूज्य श्री अद्श्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे सिद्धगिरी हॉस्पिटलने पुन्हा एकदा जागतिक दर्जाची आरोग्यसेवा आणि शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध करून दिले आहे. 

ब्रेन बायपास अर्थात मायक्रोव्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस ही न्यूरोसर्जरीतील अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया असून, ती आतापर्यंत केवळ महानगरातील कॉर्पोरेट रुग्णालयांपुरती मर्यादित होती; परंतु डॉ. मारजवके यांनी ती ग्रामीण भागातील धर्मदाय रुग्णालयात यशस्वीपणे राबवून नवा इतिहास रचला आहे.

या कार्यशाळेत डॉ. प्रा. द्वारकानाथ श्रीनिवास आणि डॉ. बुटक दियोरा यांच्यासह तज्ज्ञांनी सिलिकॉन ट्यूब व धमनी मॉडेलवर प्रशिक्षणाचे धडे दिले. कार्यशाळेच्या समारोपानंतर १५ जून रोजी 'मोया-मोया' (Moyamoya Disease) या दुर्मिळ आजारावरील ब्रेन बायपास शस्त्रक्रियेचे थेट (Live Surgery) प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
डॉ. मारजवके यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण रुग्णालये ही जागतिक स्तरावर न्यूरोसर्जरी प्रशिक्षणाचे केंद्र बनू शकतात, हे सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सिद्धगिरी हॉस्पिटलने कोल्हापूरचे नाव जागतिक नकाशावर कोरले असून, 'उत्कृष्टतेला पोस्टकोड नसतो' हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes