SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेष

जाहिरात

 

‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुली

schedule03 Oct 26 person by visibility 168 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भारतीय आणि जागतिक सिनेमामध्ये वंचित घटकांचे प्रतिनिधित्व, त्यांचे चित्रण तसेच मुख्य प्रवाहातील सिनेमातील त्यांचे स्थान यावर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मास कम्युनिकेशन विभागात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या दिवशी ज्येष्ठ संपादक व चित्रपट अभ्यासक डॉ. विजय चोरमारे ‘भारतीय चित्रपटातील वंचितांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन करतील. वंचित घटकांचे अभ्यासक अविनाश भाले ‘LGBTQ+ चे सिनेमातील चित्रण’, तर जागतिक सिनेमाच्या अभ्यासक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी ‘जागतिक परिदृश्यात वंचितांचा सिनेमा’ या विषयांवर विचार मांडतील.

दुसऱ्या दिवशी पुणे येथील चित्रशारदाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर ‘सिनेमातील लिंगाधारित पूर्वग्रह’, तर चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया ‘वंचितांच्या चित्रपटांचे भवितव्य आणि आव्हाने’, तसेच  ख्यातनाम अभिनेते व लेखक डॉ. मिलिंद शिंदे ‘वंचित घटक आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, प्रतिनिधित्व आणि वंचित घटकांच्या प्रश्नांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी मिळावी, हा कार्यशाळेचा उद्देश आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे विद्यार्थी, चित्रपट अभ्यासक, माध्यम क्षेत्रातील व्यक्ती तसेच सिनेमात रस असणाऱ्या नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बी.ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव  यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes