SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेष

जाहिरात

 

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी

schedule03 Oct 26 person by visibility 169 categoryआरोग्य

उमळवाड : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने उमळवाड येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४५० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात २७५ नागरिकांची नेत्र तपासणी, तर १७५ नागरिकांची फिजिकल आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या या आरोग्य अभियानांतर्गत कवठेसार , कोथळी, दानोळी आणि उमळवाड या तीन गावांमध्ये आतापर्यंत एकूण १ हजार ९११ नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली आहे.

यावेळी नेमिनाथ खुळे, भरमा मगदूम, मिलिंद मगदूम, विद्याधर कर्वे, सरपंच छाया कर्वे, उपसरपंच कोळी, मदन संकपाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes