SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

महिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा

schedule03 Oct 26 person by visibility 373 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महिलांच्या कौशल्याला व्यवसायाची जोड मिळावी आणि मार्केटिंग व विक्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि इंडो काउंट फाऊंडेशन अंतर्गत महालक्ष्मी कौशल्य विकास केंद्र, गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मार्केटिंग व विक्री कौशल्य’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात येत्या सोमवारी (दि. ५) सकाळी १० वाजता ही कार्यशाळा होणार आहे.

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, इंडो काउंटचे सल्लागार प्रफुल्ल रंगारी आणि उमेदचे जिल्हा व्यवस्थापक दयानंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक मार्गदर्शक रविंद्र खैरे आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ प्रमुख मार्गदर्शक असतील. कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार हे अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाला प्रमोद कांबळे, ईश्वर पुजारी उपस्थित असतील.

महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योग व व्यवसायाच्या संधींची माहिती मिळावी, तसेच मार्केटिंग आणि विक्री कौशल्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला प्रशिक्षणार्थी, व्यवसायाची सुरुवात करू इच्छिणाऱ्या महिला तसेच कौशल्यविकासात रुची असणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, अशी आशा केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes