SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राईट फ्लायर III: विमान वाहतूक इतिहासातील सुवर्णपानबदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणी

जाहिरात

 

रेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटन

schedule03 Oct 26 person by visibility 405 categoryउद्योग

◼️प्रवाशांच्या सुविधेसाठी नूतनीकरण केलेले कार्यालयात  विविध प्रवासी सेवा एकाच छताखाली उपलब्ध 

कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर प्रशालेजवळील सेंट्रल ऑथराइज्ड रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले हे केंद्र आता कार्यान्वित झाले आहे.

हे केंद्र कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्सया फर्मच्या माध्यमातून कार्यरत असून, उमेश शहा हे संचालक आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या केंद्रामार्फत प्रवाशांना आरक्षणासह विविध प्रवासी सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी उमेश शहा यांचे सुपुत्र कौस्तुभ शहा हे नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.

केंद्रामध्ये रेल्वेच्या विविध श्रेणींचे आरक्षण, ई-रेल्वे तिकीट, लक्झरी बस, रेडबस तसेच विमानसेवेचे बुकिंग करून दिले जाते. याशिवाय हॉटेल बुकिंग आणि मनी एक्स्चेंजची सुविधाही उपलब्ध आहे.

तसेच आयआरसीटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशातील विविध पर्यटनस्थळांसाठी टूर पॅकेज आणि प्रवासाचे नियोजन करता येते. शालेय व शैक्षणिक सहली, समूह सहली, कुटुंबीय तसेच इतर प्रवाशांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुखकर आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी आरक्षणासोबत योग्य मार्गदर्शन करण्यावरही भर दिला जातो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि गरजू प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केंद्राच्या आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी तिकीट घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मोबाईलवरूनही बुकिंग स्वीकारले जाणार असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.

रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूरच्या आगामी वीस वर्षांची गरज लक्षात घेऊन वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर वाहतूक, निवास आणि आदरातिथ्याच्या सुविधा विकसित झाल्यास कोल्हापूरच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.


प्रवासी वर्गाचे आरक्षण करून देण्याबरोबरच त्यांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाचेल, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठी शहा परिवाराने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार अमल महाडिक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्टेशन मास्टर विजय पोद्दार, मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य  बाबासाहेब निंबाळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष  संजय शेट्टी सुजय शेटे क्रिडाई चे सुजय होसमाने बीडीओ मिलिंद टोणपे - कोठारी  तसेच इतर मान्यवरांनीही केंद्राला शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes