SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहावेप्रा. जगदीश सरदेसाई यांना मानसशास्त्र विषयातून पीएच. डी. इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रथमच ‘आयपीपीएल’ स्पर्धेचे आयोजन; ३ ऑक्टोबरपासून रोटरी समाज केंद्रात विशेष प्रशिक्षणचेहऱ्यावरचे हसू अनमोल: जागतिक स्माइल दिन विशेष

जाहिरात

 

माजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील

schedule03 Oct 26 person by visibility 382 categoryउद्योग

कोल्हापूर  : गोकुळ दूध संघाच्या खासगीकरणासाठी २०० कोटी रुपयांची ऑफर दिली गेल्याचा खळबळजनक दावा माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केल्यानंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून, "माजी मंत्र्यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे," अशी टीका त्यांनी केली.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, "गोकुळ दूध संघ 'मल्टीस्टेट  होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही मोठा लढा दिला. जर त्यावेळी गोकुळ मल्टीस्टेट झाला असता, तर आता गोकुळच्या निवडणुका कधी झाल्या हे दूध उत्पादकांना कळलेसुद्धा नसते. तत्कालीन भाजप सरकारच्या काळातील दुग्धविकास मंत्र्यांकडेच काही लोक गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी देवाण-घेवाणीची चर्चा घेऊन गेले होते, ही बाब आता समोर आली आहे."

पुढे बोलताना पाटील म्हणाले, "गोकुळला आधी मल्टीस्टेट करायचे आणि नंतर देशभरात कोणाच्या तरी घशात घालायचे, असा हा मोठा डाव चालू आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नसून कोल्हापूरच्या अस्मितेची आणि सामान्य दूध उत्पादकांच्या हिताची लढाई आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी स्वतः हा प्रकार जाहीरपणे उघड केला असल्याने सर्वांनी या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे."

"गोकुळवर आलेले हे खासगीकरणाचे संकट बाजूला करायचे असेल, तर आगामी निवडणुकीत दूध उत्पादकांनी आमच्या समविचारी आघाडीलाच पूर्ण ताकदीने साथ द्यावी," असे आवाहनही त्यांनी केले.

 महायुतीचे नेते आता दिल्लीत जाणार आहेत पुढील रणनीतीसाठी दिल्लीत बैठक होणार असून या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आणि निवडणुकीच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या पॅनेल साठी महायुतीचे सर्व नेते सोमवारी ७ तारखेला सर्व प्रमुख नेते दिल्लीला जाणार असून तेथे पक्षश्रेष्ठींसोबत महत्त्वाची बैठक करून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आले असल्याची उपासमात्मक टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes