SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदम

schedule20 Aug 26 person by visibility 99 categoryसामाजिक

▪️कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवउद्गार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काढले.

कोल्हापूर विमानतळ येथे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी स्वागत केले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक व कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या शिक्षक आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले प्रचार माहिती पत्रक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रसारित करण्यात आले.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे आरोग्यविषयक उपक्रम, गरजू रुग्णांना मदत, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि जनसेवेचे विविध उपक्रम याबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

“जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी जनसेवा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे,” अशी भावना यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हाप्रमुख मनमोहन खोत, शहरप्रमुख विनायक जाधव, उपशहरप्रमुख अतुल साळोखे, लक्ष्मण सुरवसे, जीवन धुळूप आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes