SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणार

schedule19 Aug 26 person by visibility 352 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात 1 हजार 400 नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकष व अटी-शर्ती लागू झाल्याने नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

यापूर्वीच्या जाहिरनाम्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 400 केंद्रांच्या वाटपासाठी एकूण 3 हजार 617 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून प्रारूप यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती घेऊन मुलाखती घेण्याचे नियोजन प्रस्तावित होते.

दरम्यान, 9 जुलै रोजी आपले सरकार सेवा केंद्र' वाटपाबाबत नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. या निर्णयातील सुधारित निकष व अटी-शर्ती नवीन केंद्रांच्या निवडीसाठी लागू असल्याने यापूर्वी सुरू असलेली प्रक्रिया पुढे राबविणे शक्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्याची प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर स्थगित ठेवण्यात येत  आहे.

नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकषांसह नव्याने जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांना नव्याने ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes