SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

गरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

schedule19 Aug 26 person by visibility 188 categoryराज्य

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असणारी सर्व कामे दर्जेदार करा. गरुड मंडपाचे काम शक्य तितक्या गतीने करा. गरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या.

श्रीअंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सुयश पाटील, कॉन्ट्रॅक्टर चंदुलाल ओसवाल, कन्सल्टंट योगेश कासार -पाटील आदी उपस्थित होते.

अंबाबाई मंदिराला भेट देऊन गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी पाहणी केली जाईल. तसेच येत्या आठवड्याभरात पुन्हा बैठक घेऊन झालेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी स्पष्ट केले.

वर्षा साळुंखे व सुयश पाटील यांनी कामाच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes