SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’

schedule20 Aug 26 person by visibility 8 categoryराज्य

कोल्हापूर : मृद व जलसंधारण विभागामार्फत जलसंधारण दिनानिमित्त 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत मृद व जलसंधारणाबाबत युवा पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सकाळी 6.30 वाजता ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनचे उद्घाटन व ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन स्पर्धा समाप्तीनंतर वारणा भवन, ताराबाई पार्क येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार सर्वश्री शाहू छत्रपती, धनंजय महाडीक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडीक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थितत राहणार आहेत.

दरम्यान, 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी 15 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ Instagram Reel स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल पवार यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes