SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणी

जाहिरात

 

सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा

schedule12 Aug 26 person by visibility 187 categoryउद्योग

🟢सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाची मोठी चपराक
        
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या एकूण ६४४ सभासद संस्था प्रशासनाने अवसायनात काढल्या होत्या. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सहकारी दूध संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गेल्या होत्या. याची सुनावणी काल व निकाल आज होऊन या संस्थांना उच्च न्यायालयाने पात्र ठरवले. त्यामुळे; अवसायनात काढलेल्या सर्वच संस्थांच्या पात्रतेचा म्हणजेच पर्यायाने मतदानाच्या हक्काचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाठीमागून लढणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाने या निकालाद्वारे मोठी व जोरदार चपराक हाणली आहे.
​            
सहाय्यक निबंधक - दुग्ध  कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनातील संस्थांबाबतचे आदेश हे नैसर्गिक न्यायतत्त्वास धरून नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती  शैलेश ब्रह्मे यांनी हा निकाल दिला.
​           
या दूध संस्थांच्या भवतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक, ॲड. प्रबोध पाटील, ॲड. धैर्यशील पवार आणि सरकारच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी काम पाहिले.
​             
आज बुधवार दि. १२  ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला निकाल जाहीर होताच या संस्था प्रतिनिधींनी सहनिबंधक कार्यालय (दुग्ध) समोर गुलालाची उधळण व फटाके वाजवून आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes