SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी व उपनिबंधक देविदास मिसाळ यांचेविरुद्ध अवमान याचिका दाखल होणारसफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी : शेरसिंग डागोरस्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणहॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा : आपची मागणी केआयटीमध्ये ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’ या कार्यशाळेचे आयोजनअंगदान दिन: जीवनदानाची अपूर्व संधीकाळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठागांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशारा

जाहिरात

 

'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहिती

schedule12 Aug 26 person by visibility 236 categoryउद्योग

वारणानगर : वारणा दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ केली आहे. तसेच म्हैस दूध विक्री दर प्रतिलिटर २ रुपये दरवाढ करण्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे  यांनी दिली. ही दरवाढ मंगळवार दि. ११ ऑगष्ट पासून लागू झाली आहे.

 डॉ. कोरे म्हणाले, की शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आता म्हैस दूधाच्या ६.० फॅट व ९.० एस.एन. एफ. ला खरेदीरात प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे, तर गाईच्या
३.५ फॅट. व ८.५ एस.एन.एफ च्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर १ रुपया वाढ केली आहे. तर म्हैस दुधाच्या विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ मंगळवार दि. ११ ऑगष्ट पासून लागू होणार असल्याचे अध्यक्ष एच. आर. जाधव आणि कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगीतले.
सध्या संघाकडील दूध व दुग्धजन्य पदार्थाना  वाढीव मागणी प्राप्त झाली आहे. संघाची दही, तूप,पनीर,लस्सी, ताक, इत्यादी पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. संघाने अल्पदरात पशु वैद्यकीय सेवा,अमृत पशुधन सुरक्षा कवच योजना, रेडी संगोपन योजना,जातिवंत म्हैस संवर्धन योजना,इतर अनुदान पर योजना तसेच दिवाळीत फरक बिल या सारखे उपक्रमाच्या माध्यमा तुन अधीकाअधिक परतावा दूध उत्पादकांना देण्याची वारणाची परंपरा राहिली आहे असे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.

 यावेळी उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील,अकौंटस मॅनेजर प्रविण शेलार, संकलन व्यवस्थापक डॉ. जे. बी. पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले उपस्थित होते.

◼️वारणा - प्रतिदिन दूध- ५० हजार लिटर,दही विक्रीत १५ टनाने वाढ,तर पनीर मध्ये  ५ ते ६ टनाने वाढ
वारणा ने शुद्धता व दर्जामध्ये कधीही तडजोड केलेली नाही. सध्या वारणाच्या दूधात पूर्वीच्या विक्रीपेक्षा गेल्या दोन महिन्यात तब्बल प्रतिदिन ५० हजार लिटर ची  विक्रीवाढ झाली आहे. तसेच पनीर मध्ये
प्रतिदिन ५ ते ६ टन, दही १५ टन  वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दही विक्री झाल्याचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगीतले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes