15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026
schedule12 Aug 26 person by visibility 150 categoryराज्य
इचलकरंजी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केन चेस अकादमी इचलकरंजी तर्फे व चेसबेस इंडिया च्या सहकार्याने 'द बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्ष परंपरा असलेले मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) हे या कॅम्पचे व्हेन्यू पार्टनर आहेत.
हा पूर्णपणे मोफत चेस कॅम्प शनिवार , 15 ऑगस्ट 2026 रोजी स्व. प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन व डॉ. दिलीप ललासाहेब देशमुख हॉल, यशवंत प्रोसेस मागे, कल्याण केंद्र रोड, इंडस्ट्रीयल इस्टेट, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कॅम्पची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी आहे. या वेळेत खेळाडू केव्हाही येऊ शकतात. हा कॅम्प सर्व वयोगटातील चेस प्रेमींसाठी खुला आहे.
अनुभवी प्रशिक्षकांकडून मूलभूत ते प्रगत पर्यंत चेस प्रशिक्षण, कौशल्ये व रणनीती सुधारण्यासाठी मार्गदर्शन, तसेच विविध मजेशीर चेस अॅक्टिव्हिटी बुद्धिबळ खेळा आणि एकाचवेळी अनेकजण सोबत बुद्धिबळ खेळा इत्यादी आयोजित करण्यात आले आहेत.
फिडे विकासात्मक प्रशिक्षक व वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ - 9657333926 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू व शाळेत बुद्धिबळ उपक्रम - वरिष्ठ प्रशिक्षक रेश्मा नलवडे 9096221178 यांच्याशी संपर्क साधता येईल.
"शिकणार,खेळणार भारत - तर जिंकणार भारत" या ब्रीदवाक्यासह अधिकाधिक लोकांनी या मोफत कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.