SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणी

जाहिरात

 

हॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणी

schedule11 Aug 26 person by visibility 221 categoryक्रीडा

कोल्हापूर : जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत सन 2026-27 करिता क्रीडा प्रबोधिनीमध्ये हॅण्डबॉल खेळासाठी सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे.

हॅण्डबॉलच्या राज्यस्तर सरळ प्रवेश चाचणीचे आयोजन 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान, तर खेळनिहाय कौशल्य चाचणी 18 ते 19 ऑगस्ट रोजी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर येथे होणार आहे. सरळ प्रवेश चाचणीसाठी खेळाडूंनी 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत, तर कौशल्य चाचणीसाठी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

सरळ प्रवेश चाचणीसाठी राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीयस्तर सहभाग प्रमाणपत्र, तर खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र आवश्यक आहे. या चाचणीसाठी 19 वर्षांखालील खेळाडू पात्र आहेत. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करावी. तसेच प्राविण्य/सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड इ.), इतर आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच योग्य स्पोर्ट्स किटसह उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील अधिकाधिक हॅण्डबॉल खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. भूषण इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक (हॅण्डबॉल) – मो. 7447654989 यांच्याशी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes