SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी : शेरसिंग डागोरस्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणहॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा : आपची मागणी केआयटीमध्ये ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’ या कार्यशाळेचे आयोजनअंगदान दिन: जीवनदानाची अपूर्व संधीकाळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठागांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशाराप्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूल

जाहिरात

 

लिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात

schedule11 Aug 26 person by visibility 358 categoryराज्य

मुंबई :लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे सकारात्मक चर्चा झाली.विशेषतः जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महाविकास मंडळाच्या योजनांचा सरसकट लिंगायत समाजबांधवांना लाभ मिळावा तसेच जाचक अटी दूर करण्यात याव्यात,या प्रमुख मागणीवर शासन सकारात्मक असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

आजच्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.तसेच  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मा.उपमुख्यमंत्री सुनित्रा ताई पवार आणि यांच्या समवेतही लिंगायत समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत यापूर्वीही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज सकारात्मक दिशा मिळाली असून, लिंगायत समाजबांधवांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.

या पाठपुराव्यात बसव मृत्युंजय महास्वामीजी,आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर),आमदार शिवाजी  पाटील  आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राजेंद्रजी पाटील मंगेश दादा चिवटे,पैलवान नितीन पाटील मा संजय तेलनाडे तसेच लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने  मुख्यमंत्री महोदयांसह सर्व संबंधित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes