SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहनशिरोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यशशरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकरकोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जाहिरात

 

शरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकर

schedule14 Oct 26 person by visibility 186 categoryउद्योग

◼️शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ

नरंदे : शरद सहकारी साखर कारखान्याने गेल्या पंचवीस वर्षात शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देत सर्वांची बिले वेळेत देत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कारभार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. चालू हंगामातही दर देण्यात कारखाना आघाडीवर राहील.

 कामगारांनी नैतिक मूल्यांचे आचरण करून प्रामाणिकपणे काम केले पाहिज. गत वेळेप्रमाणे येणाऱ्या दिवाळीसाठीही कामगारांना २१ टक्के बोनस देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली.

   नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी आमदार पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आले.यावेळी संचालक युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर,जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण,प्रचिता कोळी,पंचायत समिती सदस्य प्रतीक पाटील, फजलेअली पटेल,प्रविन देसाई,दिप्ती जाधव,उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

   आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.यामुळे उत्पादनात १५ टक्के वाढ होऊन ३५ टक्के खर्चात बचत होईल. कारखाना ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे.चालू हंगामात आठ लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वागत संचालक सुभाषसिंग रजपूत यांनी केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.


  यावेळी माजी उपसभापती राजकुमार भोसले,सरपंच अमोल कांबळे,आप्पासाहेब चौगुले,डी.बी. पिष्टे,पोपट भोकरे,रावसाहेब चौगुले,संजय नांदणे,शिवगोंडा पाटील,संजय बोरगावे, विद्यासागर मरजे, अभिजित भंडारी, रावसाहेब कुंभोजे, कार्यकारी संचालक मोतीलाल पट्टनकुडे,मुख्य कार्यकारी बी. ए.आवटी,शेती अधिकारी रमेश गंगाई उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes