SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहनशिरोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यशशरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकरकोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जाहिरात

 

महायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारी

schedule14 Oct 26 person by visibility 215 categoryराजकीय

◼️डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी महायुतीची एकजूट ; घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीने पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, त्यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने मैदानात उतरणार आहेत.

या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी व्यापक मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यास महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीची रणनीती, प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि महायुतीच्या घटक पक्षांमधील समन्वय यावर चर्चा होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत उमेदवारांची भूमिका व विचार पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे नियोजन यावेळी करण्यात येणार आहे.

दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवली जात असल्याने सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करणे महत्त्वाचे आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला अधिक गती देत संघटनात्मक ताकद एकवटण्यावर भर दिला जाणार आहे.

महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या सर्वांनी या मेळाव्यास वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes