SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
श्री विनय कोरे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहनशिरोळ तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश; आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यशशरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकरकोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुलीमहायुतीच्या वतीने शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा व्यापक मेळावा उद्या बुधवारीकोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर: घरफाळा थकबाकी व विनापरवाना वापरामुळे दोन मिळकती सील; महापालिकेची ३० लाखांची वसुली

schedule14 Oct 26 person by visibility 191 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत थकीत घरफाळा वसुली आणि विनापरवाना वापराविरोधात कारवाई करण्यात आली. विभागीय कार्यालय क्र. ४, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत आरसीसी कोचिंग क्लासेस या मिळकतीचा घरफाळा थकीत असल्याने ती सील करण्यात आली. तसेच वटेश्वर महादेव मंदिराजवळील पेट्रोल पंपालगत असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरचा विनापरवाना वापर सुरू असल्याने संबंधित मिळकतही सील करण्यात आली.

महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत थकीत रकमेच्या वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या. या कारवाईदरम्यान दिवसभरात एकूण ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त परितोष कंकाळ व सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. यामध्ये अधीक्षक श्रीमती अर्चना प्रभावळे, लिपिक भगवान मांजरे, विजय वाघेला, राहुल लोखंडे तसेच उपद्रव शोध पथकाच्या जवानामार्फत करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes