‘औषधांच्या पलीकडे’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
schedule20 Nov 26 person by visibility 94 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रथितयश मानसतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगुले लिखित ‘औषधांच्या पलीकडे : एका सायकियाट्रिस्टची यशोगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या रविवारी, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडणार आहे.
प्रसिद्ध साहित्यिक व मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील कुमार लवटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित केलेल्या या पुस्तकात अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक तणावावर मात केलेल्या रुग्णांच्या ३८ जिवंत अनुभवकथा मांडल्या आहेत.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (KMA), जेरियाट्रिक सोसायटी (KGS), स्वस्तिक हॉस्पिटल आणि भाग्यश्री प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास नागरिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.