SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अपघातात मृत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहणार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा३४ जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया; आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १६ हजार ७०१ वरचांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य : डॉ. बी. आर. कोरेकामचुकार अधिकाऱ्यांवर हक्कभंग, विरोधकांना ३० वर्षांचा जाब; आमदार राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर महापालिकेत कडक इशारा!शिवाजी ट्रेल ट्रेकचा २४ नोव्हेंबर रोजी शुभारंभ; दहा दिवस चालणार साहसी मोहीमकोल्हापुरातील कसबा बावडा सेवा रुग्णालयात आता ‘यलो फिव्हर’लसीकरण केंद्र सुरू होणार !कोल्हापूर जिल्हा रिक्षा बंदचा एल्गार! सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा‘औषधांच्या पलीकडे’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशनऊस शेतीतील ए. आय. तंत्रज्ञानामुळे फोंड्या माळावर एकरी ९० टन उत्पादनईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धा’ आता २८ नोव्हेंबरला!

जाहिरात

 

शिवाजी ट्रेल ट्रेकचा २४ नोव्हेंबर रोजी शुभारंभ; दहा दिवस चालणार साहसी मोहीम

schedule20 Nov 26 person by visibility 191 categoryराज्य

कोल्हापूर : एनसीसी हेड ऑफिस, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘शिवाजी ट्रेल ट्रेक’ या साहसी उपक्रमाचा शुभारंभ येत्या मंगळवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता एनसीसी हेड ऑफिस, कोल्हापूर येथून होणार आहे.

या दहा दिवसीय ट्रेकमध्ये सहभागी एनसीसी कॅडेट्स कोल्हापूर, पन्हाळा, मलकापूर आणि पांढरपाणी या ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करणार आहेत. कोल्हापूर येथून सुरू होणाऱ्या या मोहिमेची दहा दिवसांनंतर पुन्हा कोल्हापूर येथे सांगता होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक शौर्य, धैर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास हा या कॅडेट्सपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या साहसी मोहिमेच्या माध्यमातून कॅडेट्समध्ये शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना, साहस आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होणार आहे.

या ट्रेकमुळे कॅडेट्सना ऐतिहासिक वारसा, स्थानिक संस्कृती आणि निसर्ग यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात आली .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes