SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कळे बाजारपेठेतील रस्ता 31 मेपर्यंत बंदजिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवडरगेडियन फिटनेस क्लब आणि कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरास प्रतिसादथोरले पेशवे बाजीराव : अपराजित सेनानीकोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहनडी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानीमहिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲपदुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत

जाहिरात

 

जिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवड

schedule28 Apr 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागांतर्गत चालणाऱ्या 'एम.एस्सी. जिओइन्फॉरमॅटिक्स' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानकौशल्याच्या जोरावर आकर्षक रोजगारसंधींना गवसणी घातली आहे. सन २०२३ पासून सुरू झालेल्या या विशेष अभ्यासक्रमाच्या सात विद्यार्थ्यांनी आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यापूर्वीच नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) स्थान प्राप्त करून विद्यापीठाचा लौकिक वाढवला आहे.

या प्लेसमेंट मोहिमेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे आणि कंसात निवड करणारी कंपनी यांची नावे पुढीलप्रमाणेः श्रद्धा नाईकबा यादव (स्कायलार्क ड्रोन्स कंपनी, बंगळुरू) निकिता राजेंद्र जाधव (आयमेरिट (iMerit) टेक्नॉलॉजी', पुणे), शेखर मुत्तप्पा कांबळे (अर्थयार्ड इन्फोटेक, राजस्थान), शुभम रामचंद्र पाटील जिओ-इन्फो सर्व्हिसेस, नवी मुंबई), मोहिनी राजाराम सुतार (ॲटलास जिओग्राफिक डेटा प्रा. लि., पुणे) निर्मिती वैभव दुरे (एल.ई.ए. असोसिएट्स साउथ एशिया प्रा. लि., मुंबई), राहुल गोसावी (टेरा इन्फॉर्मेटिक सर्व्हिसेस, पुणे). यातील काही विद्यार्थ्यांना वार्षिक ६ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपली अंतिम सत्राची परीक्षा नुकतीच दिली असून, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांना या नामांकित कंपन्यांकडून नियुक्ती पत्रे प्राप्त झाली आहेत. अधिविभागाने त्यांना प्रदान केलेली तांत्रिक कौशल्ये आणि दर्जेदार प्रशिक्षण याचेच हे फलित ठरले आहे.

या संदर्भात अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या या यशाचे मुख्य गमक म्हणजे विभागाचा 'उद्योग-केंद्रित' (Industry-Centric) अभ्यासक्रम आहे. आजच्या युगात जिओ-स्पेशियल डेटा, ड्रोन तंत्रज्ञान आणि रिमोट सेन्सिंग या क्षेत्रांची वाढती मागणी लक्षात घेऊनच हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विभागाकडे स्वतःच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा असून, त्यामध्ये सर्व प्रकारचे अद्ययावत सर्वेक्षण साहित्य आणि महत्त्वाच्या सॉफ्टवेअर्सचे परवाने उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता थेट प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळत आहे, ज्याचा फायदा त्यांना प्लेसमेंट दरम्यान झाला.

या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. अभिजित पाटील, डॉ. पी. टी. पाटील, डॉ. व्ही. ए. चौगुले, डॉ. सुधीर पवार आणि शुभम गिरीगोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
एम.एस्सी. जिओइन्फॉरमॅटिक्स या करिअरच्या दृष्टीने अत्यंत उज्ज्वल भविष्य असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ड्रोन सर्वेक्षण, नकाशाशास्त्र, जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग यांसारख्या आधुनिक विषयात रस असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पन्हाळकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes