SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहनडी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानीमहिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲपदुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेतसिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केजिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारीकोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरव

जाहिरात

 

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲप

schedule27 Apr 26 person by visibility 99 categoryराज्य

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थ्यांसाठी डिजिटल सेवांकडे मोठे पाऊल टाकत “Annasaheb Patil Mahamandal App” हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.

महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित आहे. याआधी अर्ज प्रक्रियेसाठी संगणक किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही ठिकाणी एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना घडत असल्याने लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करून प्रति सेवा ८५ रुपयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. नवीन वापरकर्ते मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे OTP पडताळणी करून नोंदणी करू शकतात, तर आधीपासून नोंदणीकृत लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे थेट प्रवेश मिळतो.

महामंडळाच्या योजनांमध्ये LOI, Sanction आणि Claim असे तीन टप्पे असून, आवश्यक कागदपत्रे ॲपवर अपलोड करता येतात. अर्जाची स्थिती तपासणे, अद्ययावत माहिती मिळवणे आणि पुढील कार्यवाही करणे या सुविधा ॲपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली आहे. क्लेम सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होणार आहे.

यामध्ये जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या सहाय्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाणार आहे. ही माहिती महामंडळाच्या EHRMS प्रणालीशी संलग्न करण्यात येणार असून पुढील टप्प्यात ही सुविधा मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध होणार आहे.

गरजूंनी ॲप डाउनलोड करून या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes