रगेडियन फिटनेस क्लब आणि कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरास प्रतिसाद
schedule28 Apr 26 person by visibility 114 categoryराज्य
कोल्हापूर : कोरगावकर ग्रुप आणि रगेडियन फिटनेस क्लब, रंकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, होमिओपॅथी व ऑर्थोपेडिक तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच बीपी, शुगर तपासणीसह हृदयविकारासंदर्भातील (कार्डिओलॉजी) सल्ला देखील देण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रतापसिंह जाधव, कोरगावकर ग्रुपचे प्रमुख आकाश कोरगावकर,राज कोरगावकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामध्ये 100 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा तसेच रक्तदान शिबिराचा लाभ घेतला.