SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
1 मे रोजी ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ उपक्रमकळे बाजारपेठेतील रस्ता 31 मेपर्यंत बंदजिओइन्फॉरमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांत निवडरगेडियन फिटनेस क्लब आणि कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरास प्रतिसादथोरले पेशवे बाजीराव : अपराजित सेनानीकोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहनडी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानीमहिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲप

जाहिरात

 

कळे बाजारपेठेतील रस्ता 31 मेपर्यंत बंद

schedule28 Apr 26 person by visibility 98 categoryराज्य

कोल्हापूर : प्र.जि.मा. 78 वरील कळे बाजारपेठ (दस्तुरी चौक ते देसाई गल्ली फाटा) या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता 28 एप्रिल ते 31 मे या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड व हलक्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 अन्वये जारी केले आहेत.

कळे गावातील बाजारपेठ भागात काँक्रीट रस्ता व आर.सी. गटर्सचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. काँक्रीट रस्त्यासाठी आवश्यक कॅम्बर राखणे, तसेच डी.एल.सी.सी. व इतर थरांचे काम करताना अडथळे येत आहेत. याशिवाय काँक्रीटच्या दोन्ही थरांना किमान 28 दिवस ‘क्युरिंग’ आवश्यक असल्याने या कालावधीत कोणतीही वाहतूक करणे शक्य नसते. बाजारपेठेतील गर्दी, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे व विद्युत तारा यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️पर्यायी वाहतूक व्यवस्था :- गनबावडाकडून बाजारभोगांव अणुस्कूरा घाटाकडेकडे जाणाऱ्या हलक्या 4 चाकी वाहनांकरीता राष्ट्रीय महामार्ग 166 जी पासून हरिजन वस्ती कमान ते मराठी शाळा चौक दुहेरी वाहतूक व शाळा चौक ते पुनाळ फाटा एकेरी वाहतूक व तिथून पुढे प्र.जि.मा. 78 वरून तळेवाडी. अणुस्कुराकडून गगनबावडाकडे जाणा-या हलक्या 4 चाकी वाहनाकरीता कळे एस.टी. स्टॅंड ते मराठी शाळा चौक एकेरी वाहतूक व तिथून पुढे राष्ट्रीय महामार्ग 166 जी या दैनंदिन मार्गाने गगनबावड्याकडे.

कोल्हापूर आणि गगनबावडाकडून येणाऱ्या अवजड वाहनांकरिता राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरून प्र.जि.मा. 18 वरून कोपार्डे फाटा पासून पडळ फाटा ते रा.मा. 193 वरून पुनाळ फाटा, काटेभोगाव फाटा तिथून पुढे दैनंदिन मार्गाने बाजारभोगाव मार्ग अणुस्कुरा. अणुस्कुरा मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता रा.मा. 193 वरून काटेभोगाव फाटा पासून पडळ फाटा ते कोपर्डे फाटा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 166 जी तिथून पुढे दैनंदिन मार्गाने कोल्हापूर किंवा गगनबावडा..

वाहनचालकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes