SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासाचा 'ॲक्शन प्लॅन' तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकरफॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहनडी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानीमहिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲपदुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेतसिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केजिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारीकोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरव

जाहिरात

 

फॅन्सी नंबरच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन

schedule27 Apr 26 person by visibility 103 categoryराज्य

कोल्हापूर : सोशल मिडीया (इन्स्टाग्राम) वर प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे ऑनलाईन पध्दतीने आरक्षीत करण्यात येणाऱ्या फॅन्सी नोंदणी क्रमांकाच्या शुल्क (फी) मध्ये फेरफार करून एका अर्जदाराची फसवणूक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे . नागरिकांची दिशाभूल होऊ नये व अशा प्रकारच्या फसवणुकीस आळा बसावा यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शासनामार्फत प्रत्येक आकर्षक (फॅन्सी) नोंदणी क्रमांकासाठी निश्चित शुल्क ठरविण्यात आलेले असून याबाबतच्या प्रसिध्द शासन निर्णयाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची संपूर्ण कार्यपध्दती ही पूर्णपणे ऑनलाईन आहे.

 कार्यालयामार्फत लिलाव प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध क्रमांकाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाते. त्यानंतर इच्छुक अर्जदारांनी स्वतः संकेतस्थळावर जाऊन क्रमांक आरक्षीत करणे आवश्यक आहे. ही प्रक्रीया अत्यंत सुलभ, पारदर्शक व शासनमान्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फेरफार, अनियमितता किंवा गुप्त व्यवहारास वाव राहत नाही. 

आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये बाहेरील त्रयस्त व्यक्तींकडून अर्जदार यांची आकर्षक क्रमांक हमखास मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देणे, शासन शुल्कापेक्षा अधिक रक्कम मागणे, बनावट पावत्या स्क्रिनशॉट दाखविणे  इत्यादी प्रकारे फसवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरीकांनी अशा फसवणुकीपासून सावध रहावे व याबाबत काही शंका असल्यास थेट प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर अथवा अधिकृत संकेतस्थळाशी याबाबतची खातरजमा करावी.

आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षण प्रक्रीया ही पुर्णतः ऑनलाईन व पारदर्शक आहे. त्यामुळे सर्व वाहनधारक व नागरीकांनी कोणत्याही बाहेरील त्रयस्थ व्यक्तींच्या आमिषांना बळी न पडता स्वतः अधिकृत संकेतस्थळावरून व्यवहार करावा व आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes