SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

schedule08 Sep 26 person by visibility 438 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७  मध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सहा दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध वक्ते  प्रसन्न करमरकर यांच्या ‘टाइम मॅनेजमेंट इन इंजिनिअरिंग’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाने झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल व यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख व्याख्याते करमरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन केले, तर अभ्यासाबरोबरच इतर कौशल्ये विकसित करण्यासाठीही त्यांना पुरेसा वेळ मिळू शकतो. वेळेचे व्यवस्थापन ही केवळ विद्यार्थीदशेपुरती गरज नसून, भविष्यातील व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे.अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळेचे नियोजन ही यशाची अत्यंत महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उपलब्ध वेळेचा प्रभावी वापर यामुळे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्टांकडे निश्चितपणे वाटचाल करू शकतात.” 

संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी  म्हणाले,“अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची संधी आहे. इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, अभ्यासपद्धती आणि भविष्यातील करिअरच्या संधींची योग्य दिशा मिळेल.” प्राचार्य डॉ. सुहास सपाटे म्हणाले, “नवीन शैक्षणिक वातावरणाशी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जुळवून घेणे हा इंडक्शन प्रोग्रामचा प्रमुख उद्देश आहे. ज्ञानाबरोबरच कौशल्य, शिस्त, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित केल्यास विद्यार्थी निश्चितपणे यशस्वी अभियंते बनतील.”

सहा दिवसीय इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची संपूर्ण माहिती, कॅम्पस, स्टोअर, आउट-कम बेस्ड एज्युकेशन (OBE), परीक्षा पद्धती तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. विविध अभियांत्रिकी विषयांतील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटीज, मानसिक स्वास्थ्य, कौशल्य विकास, उद्योजकता विकास यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘इंजिनिअरिंगनंतरच्या करिअरच्या संधी’ या विषयावर चर्चासत्र घेऊन उच्च शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि विविध करिअर पर्यायांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

इंडक्शन प्रोग्रामचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना कोल्हापूर व परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग, ध्यानधारणा आणि निरोगी जीवनशैली याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे नवोदित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित होण्याबरोबरच अभियांत्रिकी शिक्षणाची दिशा, करिअरच्या संधी, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकास यांची व्यापक माहिती मिळाली.  विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली , तसेच उत्कृष्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाल्याने समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे नियोजन  समन्वयक प्रा. रोहन पाटील आणि डॉ. सागर इंगोले यांनी केले. याप्रसंगी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ . जितेंद्र शिंदे, डॉ. करण पाटील , सर्व विभागप्रमुख, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी  , पालक उपस्थित होते . प्रा. डॉ. मृणाल मोहिते आणि प्रा. धनश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes