SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

जाहिरात

 

ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

schedule08 Sep 26 person by visibility 257 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना, विभागीय कार्यालय क्र.4, अतिक्रमण व अग्निशमन विभागामार्फत आज कारवाई करण्यात आली. 

 

ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील सदनिकाधारक स्वप्नील गायकवाड यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारी तसेच जनता दरबारामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सदर अपार्टमेंटमधील सामासिक अंतरामध्ये विनापरवाना बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत अपार्टमेंटच्या बांधकाम व्यावसायिकास अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम काढण्यापूर्वी तक्रारदार व बांधकाम व्यवसायिक यांना सुनावणी घेण्यात आली. नगररचना विभागीय कार्यालयात झालेल्या या सुनावणीमध्ये संबंधितांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर अंतिम सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला होता. 

या आदेशाच्या अनुषंगाने आज नगररचना विभाग, कावळा नाका विभागीय कार्यालय क्र. ४, अतिक्रमण विभाग व अग्निशमन विभागाच्या संयुक्त पथकाने आज कारवाई केली. यावेळी सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले वॉचमन केबिन, पत्र्याचे शेड, पार्किंगमधील खेळणी तसेच वॉल कंपाऊंड हटविण्यात आले. ही कारवाई एक जेसीबी, एक डंपर व गॅस कटरच्या सहाय्याने करण्यात आली.

या कारवाईवेळी सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, उपशहर रचनाकार पद्मल पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रफुल कांबळे यांच्यासह विभागीय कार्यालयातील कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes