SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

जाहिरात

 

कोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरी

schedule08 Sep 26 person by visibility 304 categoryराज्य

मुंबई  : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने 'प्रगती' (PRAGATI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली असून, हा प्रकल्प २०२६ ते २०३१ या कालावधीत राबवला जाईल. यासाठी एकूण ४,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेचे ७० टक्के (सुमारे २,९७५ कोटी) कर्ज आणि ३० टक्के (१,२७५ कोटी) राज्य शासनाचा हिस्सा असेल.

प्रकल्पांतर्गत खालीलप्रमाणे आरोग्य सुविधांचा विस्तार केला जाणार आहे:
 * कोल्हापूर आणि नांदेड: प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये.
 * पुणे: २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय (RRH).
 * लातूर आणि नागपूर: प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन.
या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची क्षमता वाढणार असून, यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. यामुळे जिल्हास्तरावरच उत्तम उपचार मिळाल्यामुळे मोठ्या शहरांमधील तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

या प्रकल्पात असंसर्गजन्य आजार (NCD) जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, तसेच स्तन, गर्भाशय मुख आणि तोंडाच्या कर्करोगाच्या वेळेत निदान व उपचारावर विशेष भर दिला जाईल. याशिवाय, मानसिक आरोग्य, पॅलिएटिव्ह केअर आणि 'महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन' अंतर्गत डिजिटल आरोग्य नोंदी व टेलिमेडिसिन सेवांचा विस्तार केला जाणार आहे. याद्वारे नागरिकांना सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि एकात्मिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes