SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागत

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेज

schedule08 Sep 26 person by visibility 377 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगरच्या रासायनिक अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील आठ विद्यार्थ्यांची मुंबईस्थित नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्यू द्वारे निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील निवड प्रक्रियेची दमदार सुरुवात करत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ लाख रुपये वार्षिक वेतन पॅकेज मिळाले आहे.

रासायनिक अभियांत्रिकी विभागातील अभिजीत विजय भोसले, अथर्व शिवाजी अडकूर, श्रुतिका महेश पाटील, वैष्णवी भारत पाटील, अमित अर्जुन दळवी आणि निरंजन सुरेश कुंभार, तसेच यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्रथमेश चव्हाण आणि समर्थ खाडे यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लिमिटेडमध्ये निवड झाली.

गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लिमिटेड ही सर्फॅक्टंट्स क्षेत्रातील जागतिक स्तरावर कार्यरत नामांकित कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली संधी ही त्यांच्या तांत्रिक ज्ञान, कौशल्य आणि उद्योगाभिमुख शिक्षणाचे द्योतक आहे. 

या निवड प्रक्रियेदरम्यान गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स लिमिटेडचे श्रीवर्धन नुवाल – उपमहाव्यवस्थापक, राजेश खाटवकर – उपमहाव्यवस्थापक, पूजा देसाई – सहायक व्यवस्थापक, समीर गोदाड – वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, पूर्णा सुब्रमणियन – व्यवस्थापक (पीई), रिना घोष – अधिकारी (पीई) आणि तन्वी थोरात – कार्यकारी अधिकारी** यांनी विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला.

संस्थेच्या ट्रेनिंग अंड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच मुलाखत कौशल्य, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी  प्राचार्य डॉ. के. आय. पाटील ,अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, प्रा. आर. सी. शिक्केरी, रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पी. बी. देहनकर आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक**  यांत्रिकी आणि रासायनिक विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes