SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजन

schedule11 Jul 26 person by visibility 120 categoryराज्य

कोल्हापूर : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांचे वतीने १०ते १८ जुलै  या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसेच देश-विदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य सप्ताहाची सुरुवात १० जुलै रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन, जवाहरनगर येथे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) नोंदणी व मार्गदर्शन सत्राने झाली. १३ जुलै रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे AI मधील संधी’या विषयावर आयटी तज्ज्ञ स्वप्निल इंगवले मार्गदर्शन करणार आहेत.

१४ जुलै रोजी सुपर कॉम्प्युटर एज्युकेशन, कोल्हापूर येथे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) नोंदणी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) याबाबत यंग प्रोफेशनल अझरुद्दीन शेख आणि जिल्हा कौशल्य विकास सहायक पराग जोशी मार्गदर्शन करतील.

१५ जुलै रोजी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उंचगाव येथे कौशल्य विकासातील संधी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना या विषयावर अझरुद्दीन शेख, पराग जोशी आणि जिल्हा समन्वयक पुष्पक पालव मार्गदर्शन करणार आहेत.

तर १६ जुलै रोजी कमला कॉलेज येथे उद्योजकतेमध्ये कौशल्यांचे महत्त्व या विषयावर जिल्हा रोजगार मेळावा समितीचे समन्वयक तथा अध्यक्ष संजय पेंडसे मार्गदर्शन करणार आहेत.

दि. १७ जुलै रोजी डॉ. दीपक पाटील नर्सिंग कॉलेज, बोरपाडळे, ता. पन्हाळा येथे परदेशातील रोजगाराच्या संधी- इस्रायल या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

 १८ जुलै रोजी राजर्षी शाहू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी कौशल्य सप्ताहातील विविध मार्गदर्शन सत्रे व रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes