SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभ

schedule11 Jul 26 person by visibility 111 categoryराज्य

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांची तीर्थस्थळांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा नागपूरमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोधगयेला जाणाऱ्या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. नागपूरमधून सुमारे ८०० भाविक या पहिल्या टप्प्यात बोधगयेच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि बोधगयेचे दर्शन घेण्याची ओढ अनेक भाविकांमध्ये असते. मात्र, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे अनेकांना ते शक्य होत नाही. अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या श्रद्धेच्या ठिकाणी पोहोचवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे केल्याबद्दल त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये याची पूर्ण दक्षता विभागाने घेतली आहे. तसेच, लवकरच बोधगया येथे महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक मोठे संकुल उभारण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, महापौर नीता ठाकरे यांच्यासह अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा तीर्थदर्शनाचा आनंद हाच या योजनेच्या यशाचा पुरावा असल्याचे यावेळी उपस्थितांनी आवर्जून सांगितले. या उपक्रमामुळे राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील तीर्थयात्रेचे स्वप्न आता वास्तवात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes