SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

विवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रम

schedule11 Jul 26 person by visibility 97 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात अनोखा सामाजिक पायंडा पाडण्यात आला आहे. सिद्धार्थ सुधर्म वाझे आणि रक्षता खटावकर यांच्या विवाहप्रसंगी आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न स्वीकारता ती रक्कम अंधशाळेला देण्याचे आवाहन वाझे परिवाराने केले होते. सुधर्म वाझे यांचे वडील कै. हिंदुराव वाझे हे अनेक वर्षे ज्ञान प्रबोधन संचलित अंधशाळेच्या कार्याशी जोडलेले होते. वडिलांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी वाझे परिवाराने हा पुढाकार घेतला होता. 

त्यांच्या या आवाहनाला मित्र आणि नातेवाईकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लग्नानंतरही सहा महिने मदतीचा ओघ सुरू राहिल्याने तब्बल सव्वा लाख रुपयांची रक्कम जमा झाली.

जमा झालेली ही मदत शनिवारी एका विशेष कार्यक्रमात अंधशाळेकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना नेते सत्यजित नाना कदम, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आदिल फरास, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेविका दिपा अजित ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, समाजमित्र डॉ. संदिप पाटील व बाबा महाडिक, उद्योगपती अभय देशपांडे, दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय विविध सामाजिक ग्रुपचे सदस्यही याप्रसंगी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुहास बोन्द्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नलावडे यांनी पार पाडले. समाजातील उपेक्षित अंधमुलांच्या मदतीसाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सुधर्म हिंदुराव वाझे यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत. वाझे परिवाराच्या या कृतीमुळे कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes