कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा
schedule11 Jul 26 person by visibility 101 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- सुरुपली असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.72 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.54 टीएमसी, जांबरे 0.30 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.67 टीएमसी, धामणी 3.85 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 27 फूट, सुर्वे 26.6 फूट, रुई 60.3 फूट, इचलकरंजी 58.8 फूट, तेरवाड 53.6 फूट, शिरोळ 47.6 फूट, नृसिंहवाडी 44.6 फूट, राजापूर 34.11 फूट तर नजीकच्या सांगली 12.11 फूट व अंकली 19.8 फूट अशी आहे.
◼️जिल्ह्यात पावसाची उघडीप
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाने उघडीप दिली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 0.1 मिमी, शिरोळ -0.0 मिमी, पन्हाळा- 0.6 मिमी, शाहुवाडी- 0.4 मिमी, राधानगरी- 0.1 मिमी, गगनबावडा- 1.3 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- 0.0 मिमी, भुदरगड- 0.2 मिमी, आजरा- 0.0 मिमी, चंदगड- 0.8 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.