SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्क

schedule18 Oct 26 person by visibility 236 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आणि 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'चे प्रमुख,आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी रविवारी सकाळी ठीक आठ वाजता गगनबावडा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथील 'श्री भैरवनाथ दूध व्यावसायिक संस्था, मुटकेश्वर' या संस्थेचे प्रतिनिधी (ठरावधारक) म्हणून त्यांनी मतदान केले.


दूध उत्पादक शेतकरी आणि प्राथमिक दूध संस्थांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तसेच 'गोकुळ'चा पारदर्शक कारभार टिकवून ठेवण्यासाठी मतदारांचा 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ला अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गोकुळचा विकास व उत्पादकांच्या हितासाठी समविचारी आघाडीच्या 'शिट्टी' या चिन्हासमोरील खानेमध्ये शिक्का मारून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes