SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वर

schedule18 Oct 26 person by visibility 185 categoryआरोग्य

शिरटी : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत शिरटी येथे आयोजित शिबिरात २७२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरानंतर अभियानातील एकूण लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वर पोहोचली आहे. या आरोग्य शिबिराला अजय पाटील यड्रावकर यांनी भेट दिली.

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या या अभियानाला शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरटी येथील शिबिरातही नागरिकांनी सहभाग घेत मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण होत असून, आजारांचे वेळीच निदान करण्यास मदत होत आहे.
यावेळी अण्णासो सुतार, सूर्यकांत उदगाव, दत्तात्रय माळी, ऋषभ पाटील, स्वप्निल पाटील, शांतिनाथ चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes