SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!

schedule18 Oct 26 person by visibility 434 categoryक्रीडा

🟣 कोल्हापुरात १५९ बुद्धिबळपटूंचा तुफान प्रतिसाद; पहिल्या ३ फेऱ्यांनंतर रंगत वाढली

कोल्हापूर  :
महालक्ष्मी मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये रविवारी (१८ ऑक्टोबर) दसरा महोत्सवा निमित्त आयोजित शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या फेरीअखेर ३ गुणांची कमाई करत राजवर्धन मोरे, हर्ष कांबळे, हर्ष मडनाईक आणि अमेय करवेकर यांनी आपापल्या गटात दिमाखदार आघाडी घेतली आहे.

अनुज् चेस अकॅडमी आणि इचलकरंजी चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, कुंभोजच्या प्रिन्सिपल  तेजस्विनी आडनाईक आणि व्हर्टिकल कंपलाईन्स प्रा. लि. गोवाच्या मॅनेजिंग डायरेक्टर  विश्वत्ता राउत-देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात झाले.

या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव  कृष्णात पाटील, इचलकरंजी चेस अकॅडमीचे मुख्य पंच  शैलेश होनकट्टी, तसेच अनुज् चेस अकॅडमीचे अनुराग पाटील आदी मान्यवर आणि पंचप्रमुख उपस्थित होते.

◼️१५९ खेळाडूंचा उस्फूर्त सहभाग
इयत्ता पहिली ते आठवी अशा एकूण आठ स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. यामध्ये कोल्हापूर आणि परिसरातील तब्बल १५९ बाल-बुद्धिबळपटूंनी अत्यंत उस्फूर्त सहभाग नोंदवला असून, मुलांमध्ये खेळाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
तिसऱ्या फेरीनंतर स्पर्धा अतिशय चुरशीची बनली असून, अंतिम फेरीत बाजी मारण्यासाठी चिमुकल्या खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes