SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!

schedule18 Oct 26 person by visibility 242 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) च्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी आज अत्यंत चुरशीच्या आणि उत्साही वातावरणात ९९.९६ टक्के विक्रमी मतदान पार पडले. एकूण ५,४१८ मतदारांपैकी तब्बल ५,४१६ ठरावधारक मतदारांनी आपल्या मताधिकार बजावला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये १०० टक्के मतदान झाले असून आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दुरुंगी लढत आणि आरोप-प्रत्यारोपांची राळ
गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींमुळे गाजलेल्या या निवडणुकीत महायुतीप्रणीत 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' विरुद्ध  'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' यांच्यात थेट दुरुंगी लढत झाली. प्रचाराच्या १५ दिवसांत आरोप-प्रत्यारोपांची मोठी राळ उडाली होती. मतदारांची फाटाफूट रोखण्यासाठी देवदर्शन, सहली आणि आणाभाकांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, अखेर आज ठरावधारकांनी आपला कौल मतपेटीत बंद केला.

◼️तालुका निहाय मतदानाची आकडेवारी:
 * करवीर: ८६५ / ८६५ (१००%)
 * कागल: ६१९ / ६१९ (१००%)
 * पन्हाळा: ५१३ / ५१३ (१००%)
 * राधानगरी: ६९९ / ६९९ (१००%)
 * भुदरगड: ५९३ / ५९३ (१००%)
 * शाहूवाडी: ४४० / ४४० (१००%)
 * चंदगड: ४२३ / ४२३ (१००%)
 * शिरोळ: २७० / २७० (१००%)
 * हातकणंगले: १६१ / १६१ (१००%)
 * गगनबावडा: १३१ / १३१ (१००%)
 * गडहिंग्लज: ३९९ पैकी ३९८ (९९.७५%)
 * आजरा: ३०५ पैकी ३०४ (९९.६७%)

सकाळी ८ वाजल्यापासून जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. करवीर तालुक्यातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल केंद्रासह विविध ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भेटी दिल्या. 

गोकुळची ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती, परंतु ती चर्चा आजच्या मतदानानंतर पूर्णपणे फोल ठरली आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी २५ च्या २५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर गोकुळची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes