SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंतीसर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणी

जाहिरात

 

कामगारांची आस, शाहू मिलचा श्वास: मिल पुन्हा सुरू करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे साकडं

schedule11 Aug 26 person by visibility 299 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूरातील शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भेट घेवून निवेदन दिले. आणि बंद पडलेली शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. 

कोल्हापुरातील गोरगरीब, दलित आणि बहुजनांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून राजर्षि शाहू महाराजांनी स्वखर्चाने ही मिल सुरू केली. मात्र त्यांच्या पश्‍चात ती मिल खाजगी कंपनीकडे चालवायला दिली. आणि त्यानंतर ती मिल वस्त्रोद्योग महामंडळाकडे गेली. मिल बंद होईपर्यंत त्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० कामगार काम करत होते. त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता. मात्र शासनाने ही मिल बंद केल्याने शेकडो कुटूंबांवर बेरोजगारी आणि उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे राजर्षि शाहू महाराजांचे जीवंत स्मारक म्हणून ही मिल पुन्हा सुरू करावी आणि माजी कामगारांच्या वारसासह कोल्हापूरातील गोरगरीब, गरजू आणि शिक्षित तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी माजी कामगार संघटनेची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शेखर कवाळे यांनी कृष्णराज महाडिक यांच्या निदर्शनाला आणून दिले. कृष्णराज महाडिक यांनी, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून, ही मिल पुन्हा सुरू करावी आणि गोरगरीब, बेरोजगार तरूणांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन कृष्णराज महाडिक यांनी दिले.

 महाडिक यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अनिल कवाळे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, शिवम बुचडे, गणेश बुचडे, राहूल कवाळे, बाळासाहेब कवाळे, किरण कवाळे, संभाजी देवपुजे, विनायक देवकुळे, जर्नादन बुचडे, दाविद भोरे, रूपाली कवाळे, जयदीप धायतडक, अनुप आवळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes