SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सीलकोल्हापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री योगेश कदमसद्भावना दिन: राष्ट्रीय एकात्मता आणि सलोख्याचा संदेशमहास्ट्राईड' प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमआपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रिया स्थगितः नव्याने जाहिरनामा काढण्यात येणारगरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ विजय राठोडकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कोल्हापूरच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी!

schedule19 Aug 26 person by visibility 293 categoryराज्य

◼️कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी पटकावले यश; दिया दापके, निहाल मुलतानी ठरले प्रथम
कोल्हापूर : देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, मौ. जावळी (आंबा घाट, जि. कोल्हापूर) आणि सांगलीचे यशस्वी प्रमोटर किशोर प्रभाकर पटवर्धन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत,  प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या 'कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर'च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

'देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट'च्या परिसरातील मानवनिर्मित (कृत्रिम) धबधबा या नाविन्यपूर्ण विषयावर ही स्पर्धा आधारित होती. या स्पर्धेचा नुकताच अत्यंत उत्साहात अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांचे चमकदार यश: प्रथम क्रमांक (गोल्ड): दिया दापके आणि निहाल मुलतानी (अंतिम वर्ष, वास्तुकला शाखा),  द्वितीय क्रमांक (सिल्व्हर): शर्वत हावळ (अंतिम वर्ष, वास्तुकला शाखा)

मान्यवरांचे मार्गदर्शन व परीक्षक : या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेसाठी ज्येष्ठ वास्तुविशारद महाजनी आणि वास्तुविशारद राहुल पाटील यांनी परीक्षक म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले.
या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर आणि चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच, आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनोरमा पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes