SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साहेब .... एकच नंबर काम घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवडनागावमध्ये भीषण आगीचा तांडव! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक; ३५ लाखांचे नुकसानसाहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त : कुलसचिव डॉ.विलास शिंदेएकात्मिक कर प्रणालीतून कर वसुलीला गती; नागरिकांना मिळणार सुलभ सेवामहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शनमंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनइयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीरमुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमीमराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."

जाहिरात

 

मराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."

schedule23 Aug 26 person by visibility 334 categoryराज्य

पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अखेर आपल्या पुण्यातील दौऱ्यात मराठीचा हुकमी एक्का चालवत पुणेकरांचे आणि विशेषतः 'जेन झी'चे मन जिंकले आहे. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी मराठीत एकच वाक्य उच्चारत संपूर्ण उपस्थितांना अक्षरशः वेड लावले. कार्यक्रमाच्या शेवटी निवेदकाने पुण्यासाठी खास संदेश मागितल्यावर, "पुणे म्हणजे प्रेम" असे मराठीत बोलत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

​पुण्यात पार पडलेल्या बहुचर्चित 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमात तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या संवाद सत्रात राहुल गांधींनी देशाच्या राजकारणापासून ते महिलांच्या अधिकारांपर्यंत विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.

▪️​महिला शक्ती आणि मनस्मृतीवर जोरदार हल्लाबोल
​ "महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे," असे सांगत राहुल गांधींनी देशाच्या प्रगतीत महिलांच्या योगदानावर भर दिला.
​मनस्मृतीवर टीका: "मनस्मृतीने महिलांना तीन चौकटीत बसवलं, महिला स्वतंत्र राहू नये हा मनस्मृतीचा डाव होता," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

▪️​विद्यार्थिनींशी थेट संवाद आणि व्यथा
​या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींनी मंचावर उपस्थित विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. अनेक विद्यार्थिनींनी थेट व्यासपीठावर येऊन त्यांना आलेल्या अडीअडचणी, समस्या आणि वाईट अनुभवांचा पाढा वाचला. राहुल गांधींनी अत्यंत आक्रमक आणि संवादात्मक भूमिकेत या सर्व व्यथा ऐकून घेत तरुणांच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले.
​या संपूर्ण जोशपूर्ण वातावरणाच्या शेवटी राहुल गांधींनी मारलेली मराठीची एंट्री आणि दिलेला "पुणे म्हणजे प्रेम" हा संदेश या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes