SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साहेब .... एकच नंबर काम घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवडनागावमध्ये भीषण आगीचा तांडव! स्क्रॅप गोडाऊन जळून खाक; ३५ लाखांचे नुकसानसाहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा हे घटक उदरनिर्वाहासाठी उपयुक्त : कुलसचिव डॉ.विलास शिंदेएकात्मिक कर प्रणालीतून कर वसुलीला गती; नागरिकांना मिळणार सुलभ सेवामहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शनमंत्री बावनकुळे व रावल यांच्याकडून डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनइयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीरमुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमीमराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."

जाहिरात

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन

schedule23 Aug 26 person by visibility 166 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.

 दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की,राज्यातील सर्व नागरिकांना सुख,समृद्धी प्राप्त होवो व चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन होवो तसेच राज्यातील शेतकरी समृद्ध होवो यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईचरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.

        यावेळी महसूलमंत्र्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.देवस्थान समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते महसूलमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला .

        याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर,आमदार अमल महाडिक,आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे-परीट, महादेव दिंडे,महेश जाधव,विजय जाधव,नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes